Surabhi Jayashree Jagdish
एप्रिल महिना संपत आला आहे आणि त्यासोबत उन्हाळा सुरू झालाय.
देशातील बऱ्याच ठिकाणी कडक उन्हामुळे शरीराची लाही लाही होतेय.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपले शरीर किती उष्णता सहन करू शकते?
मानवी शरीर किती उष्णता किंवा उच्च तापमान सहन करू शकते हे आपण जाणून घेऊ.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून, शरीर सहन करू शकणारं कमाल तापमान ४२.३°C आहे.
जर तापमान ४५ पर्यंत वाढले तर बेशुद्ध पडण्याची आणि रक्तदाब वाढण्याची तक्रार असते.
विविध अभ्यासातून असे दिसून आले आहे की मानवांना ५०° सेल्सिअस तापमान सहन करणे कठीण आहे.