Liver Health: लिव्हरमध्ये पाणी साचल्यास शरीरात कोणकोणती लक्षणे दिसतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महत्त्वाचे अवयव

लिव्हर हे शरीरातील महत्त्वाचे अवयव असून, त्याच्या खराब कार्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो.

लिव्हरचा आजार

लिव्हराच्या समस्या वेगाने वाढत आहेत, आणि अलीकडच्या काळात अनेक सेलिब्रिटींना लिव्हरचा आजार झाल्याच्या बातम्या आहेत.

गंभीर समस्या

लिव्हरमध्ये पाणी साचत नाही, पण सिरोसिसमुळे पोटात द्रव साचल्यास ती गंभीर समस्या निर्माण होते.

वजन वाढतं

जर वजन अचानक वाढत असेल आणि पोट सुजत असेल, तर लिव्हर योग्य प्रकारे काम करत नसल्याचे संकेत असू शकतात, ज्यामुळे पोटात पाणी साचते.

पोटदुखी

कमी खाल्ल्यानंतरही पोट फुगणे आणि जड वाटणे चिंताजनक आहे. पोटात पाणी साचल्याने जागा कमी होते आणि पोटदुखी होऊ शकते.

पायांमध्ये सूज येते

लिव्हरमध्ये पाणी साचल्यामुळे घोट्या व पायांमध्ये सूज येते. खराब यकृतामुळे शरीर प्रथिने आणि द्रवपदार्थांचे संतुलन राखू शकत नाही.

श्वास घेण्यात त्रास

लिव्हरच्या खराबीसह पोटात द्रव साचल्यास श्वास घेण्यात त्रास होऊ शकतो, कारण फुफ्फुस आणि डायाफ्रामवर दाब निर्माण होतो.

NEXT: तुम्हाला वारंवार घाम येतो का? होऊ शकतात 'या' गंभीर समस्या

येथे क्लिक करा