Sakshi Sunil Jadhav
टाइप १ मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ब्लड शुगरची नियमित तपासणी ही उपचाराचा महत्त्वाचा भाग आहे.
शुगरची पातळी योग्य मर्यादित ठेवली तर गंभीर गुंतागुंत टाळता येते. रीडिंगचा नेमका अर्थ समजत नाही. याबाबात तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
टाइप 1 मधुमेह असलेल्या व्यक्तींची जेवणापूर्वीची ब्लड शुगर 80 ते 130 mg/dL दरम्यान असणे योग्य मानले जाते.
जेवणानंतर दोन तासांनी ब्लड शुगर 180 mg/dL पेक्षा कमी असावी.
झोपण्याआधीची ब्लड शुगर 100 ते 140 mg/dL दरम्यान ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
वेळेवर जेवण न करणं, उशिरा जेवण, किंवा इन्सुलिन वेळेवर न घेणे ही प्रमुख कारणे आहेत.
जेवणातील कार्बोहायड्रेटचे प्रमाण अचूक मोजणे टाइप 1 मधुमेहात खूप महत्त्वाचं आहे.
मानसिक ताण, अपुरी झोप आणि थकवा यामुळे शरीरात कॉर्टिसोलसारखे हार्मोन्स वाढतात.
ही माहिती केवळ जनजागृतीसाठी आहे. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक स्थिती आणि उपचार वेगळे असू शकतात. त्यामुळे आहार, औषधे किंवा इन्सुलिनमध्ये कोणताही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.