Saam Tv
दिवसभर एकच पॅड किंवा टॅम्पॉन वापरल्यामुळे बॅक्टेरिया वाढू शकतात. त्यामुळे त्वचेची जळजळ, दुर्गंधी आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो. त्यामुळे दिवसभरात ठराविक वेळाने पॅड किंवा टॅम्पॉन बदला.
पिरीयड्समध्ये भरपूर पाणी पिणे महत्त्वाचे.कमी पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन, थकवा, डोकेदुखी , अशक्तपणा वाढतो.
पोटदुखी आणि मळमळ वाटत असली तरी जेवण स्किप करू नका. जेवलात नाही तर आवश्यक ऊर्जा आणि पोषक घटक मिळत नाहीत. त्यामुळे अशक्तपणा येतो.
जास्त मीठ, साखर आणि जंक फूड खाल्ल्याने ब्लोटिंग वाढते. त्यामुळे वेदना देखील वाढतात. अशावेळी घरचे अन्न खाणे उत्तम
मुलींना पिरीयड्समध्ये आईस्क्रिम आणि थंड खावेसे वाटते. पण हे खाल्लाने ब्लोटिंग आणि क्रॅम्प्स यात बिघाड होतो.
पिरीयड्समध्ये हार्मोनल बदलांमुळे अधिक थकवा जाणवत असतो. पुरेशी झोप न झाल्यास चीडचीड, थकवा वाढतो.
पिरीयड्समध्ये अति तीव्र व्यायाम किंवा शरीराला त्रास देणाऱ्या हालचाली करणे टाळा. यामुळे फ्लो आणखी वाढतो आणि अस्वस्थता वाढते. हलका व्यायाम, योगा करणे चांगले असते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.