Surabhi Jayashree Jagdish
लग्न करताना मुलगा मुलीपेक्षा काही वर्षांनी मोठा असण्याचं प्रमाण अनेक ठिकाणी दिसते. पती आणि पत्नी यांच्या वयात ५ ते ७ वर्षांचे अंतर योग्य मानलं जातं. मात्र केवळ वयातील अंतरावरून संसार सुखी होईल की नाही हे ठरवता येत नाही.
पती-पत्नीच्या वयात जास्त अंतर असल्यास त्यांच्या विचारांमध्ये आणि आवडीनिवडींमध्ये फरक असू शकतो. अशा वेळी एकमेकांचे विचार समजून घेणं आणि त्यांचा आदर करणं महत्त्वाचं असतं. दोघांच्या आवडीनिवडी जुळत असतील आणि एकमेकांशी चांगला संवाद असेल तर नातं अधिक घट्ट होऊ शकतं.saam tv
पती-पत्नीच्या आवडीनिवडी सारख्या असतील तर त्यांना एकत्र वेळ घालवायला आवडतं. चित्रपट पाहणं, बाहेर जेवायला जाण किंवा फिरायला जाणं यामुळे दोघांमधील जवळीक वाढू शकते. अशा छोट्या गोष्टींमुळे एकमेकांना समजून घेण्यास आणि नातं टिकवण्यास मदत होते.
लग्नासाठी केवळ वयापेक्षा व्यक्तीची समजूतदारपणा आणि जबाबदारी घेण्याची तयारी महत्त्वाची असते. लग्नानंतर घर, आर्थिक नियोजन आणि नात्यातील जबाबदाऱ्या दोघांनाही सांभाळाव्या लागतात. त्यामुळे लग्नाचा निर्णय घेताना दोघेही मानसिकदृष्ट्या तयार आहेत का, हे पाहणं गरजेचं आहे.
पती-पत्नीच्या वयात केवळ एक ते दोन वर्षांचं अंतर असेल तर त्यांचे विचार आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काही बाबतींत सारखा असू शकतो. मात्र दोघंही आपल्या मतावर ठाम राहिल्यास किंवा एकमेकांचं म्हणणं ऐकून घेत नसल्यास वाद होऊ शकतात.
पती वयाने मोठा असल्यास त्याला काही बाबतींत अधिक अनुभव असू शकतो. या अनुभवामुळे तो मतभेदांच्या वेळी शांतपणे विचार करू शकतो आणि पत्नीच्या चुका समजून घेऊ शकतो. मात्र नातं चांगलं राहण्यासाठी पत्नीच्या मताचा आदर करणं आणि दोघांनीही एकमेकांना समान महत्त्व देणं गरजेचं आहे.
पती-पत्नीच्या वयात ५ ते ७ वर्षांचे अंतर असणं हा काही लोकांच्या मते योग्य पर्याय असू शकतो. अनेकदा महिलांना वयाने मोठा जोडीदार आवडतो, तर काही पुरुषांना वयाने लहान जोडीदार आवडते.
या लेखातील माहिती महाभारतातील उपलब्ध संदर्भ, ग्रंथ आणि विविध प्रकाशित स्रोतांच्या आधारे देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्रपणे खातरजमा किंवा ऐतिहासिक सत्यता पडताळण्यात आलेली नाही. वाचकांनी कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी संबंधित मूळ ग्रंथ व विश्वसनीय संदर्भ तपासावेत.