Manasvi Choudhary
वयाच्या चाळीशीत आरोग्याची काळजी घेणे अधिक महत्वाचे आहे. हा असा काळ आहे ज्यामध्ये शरीरात रक्तातील साखर कमी जास्त होऊ शकते.
शरीरातील अनेक बदलांमुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो यासाठी वयाच्या चाळीशात रक्तातील साखर किती असावी? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
वैद्यकीय सल्ल्यानुसार, वयाच्या 40 व्या वर्षी रक्तातील साखर नियंत्रणात असणे महत्वाचे आहे.
जर तुम्ही सलग 8 ते 12 तास काहीही खाल्ले नसेल तर रक्तातील साखरेची सामान्य पातळी 70 ते 99mg/dL दरम्यान असावी.
दुपारी किंवा रात्रीचे जेवणानंतर दोन तांसांनी रक्तातील साखरेची पातळी 140 mg/dL पेक्षा कमी असावी.
उपाशीपोटी रक्तातील साखरेची पातळी >126 mg/dL किंवा HbA1c 6.5%असेल तर मधुमेह असू शकतो.
वयाच्या ४० व्या वर्षी मधुमेहाची तपासणी करणे महत्वाचे आहे. जर कुटुंबामध्ये कोणाला पीसीओएस, उच्च रक्तदाब असेल तर तुम्ही वेळीच तपासणी करून घ्या.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.