Saam Tv
अचानक पाऊस हा आपल्या शरीरासाठी चांगला नसतो. त्याने आपल्याला अनेक आजारांना सामोरं जावं लागू शकतं.
उन्हाळ्याच्या मोसमात अचानक पाऊस येत असेल त्यात भिजले असाल तर पुढील प्रमाणे काळजी घ्या.
उन्हाळ्यात अवकाळी पाऊस पडल्याने शरीराचे तापमान बदलते. शिवाय सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशा समस्यांना सामोरं जावं लागतं.
अवकाळी पावसात वातावरणातली धूळ, प्रदूषण आणि हानिकारक रसायनं हवेत मिसळतात.
त्यामुळे तुमच्या शरीराला खाज, एलर्जी किंवा जळजळ यांसारखा त्रास निर्माण होतो.
ओले कपडे अंगावर सुकवण्याची चूक कधीच करू नका. त्याने शरीराला लगेच इंफेक्शन होते.
अवकाळी पाऊस सुरु झाल्यास गरम पाणी थंड करून पिणे.
तुम्ही या दिवसांमध्ये तेलकट आणि तिखट पदार्थ खाऊ नका.