Surabhi Jayashree Jagdish
किडनी ही शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. ते रक्त शुद्ध करून टॉक्सिन्स, युरिया आणि अतिरिक्त पाणी बाहेर टाकतात. यामुळे शरीर संतुलित राहते.
किडनीने नीट काम न केल्यास टॉक्सिन पदार्थ शरीरात साचतात. यामुळे हळूहळू सूज, थकवा, उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या होतात. गंभीर अवस्थेत किडनी फेल्युअरही होऊ शकतं.
दिवसाला ८-१० ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. हे शरीरातील टॉक्सिन पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. पाणी किडनीला स्वच्छ ठेवते.
फास्ट फूड, पॅकेट स्नॅक्स आणि जास्त मीठ टाळा. हे पदार्थ किडनीवर ताण आणतात. संतुलित आहार किडनीसाठी उपयुक्त ठरतो.
लिंबूपाणी फक्त वजन कमी करत नाही. त्यातील सिट्रिक अॅसिड किडनी स्टोन रोखण्यास मदत करते. हे नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक आहे.
हर्बल टी जसं की, पुदीना, कॅमोमाइल, आलं, हिबिस्कस उपयुक्त आहेत. त्यात भरपूर अँटिऑक्सिडंट्स असतात. हे किडनीतील अपशिष्ट बाहेर काढण्यास मदत करतात.
ग्रीन टीमध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स असतात. ते किडनी स्टोनचा धोका कमी करतात. याच्या नियमित सेवनाने किडनी हेल्दी राहण्यास मदत होते.