ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या राज्यातील काही भागात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे.
पावसाचे आगमन होताच अनेकजण ट्रेकिंगचा प्लॅन करतात.
ट्रेकिंग करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टीकडे मात्र दुर्लक्ष करतात,ती म्हणजे ट्रेकिंग शूज.
चला तर पाहूयात ट्रेकिंग शूज खरेदी करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात.
कधीही ट्रेकिंग शूज खरेदी करताना चांगल्या कंपनीचे पाहून खरेदी करावे.
जर तुम्ही योग्य ट्रेकिंग शूज खरेदी न करता ट्रेकिंग केली तर तुमच्या पायाला दुखापत होण्याची शक्यता असते.
कधीही तुमच्या पायाला घट्ट बसणारे ट्रेकिंग शूज खरेदी करु नये.
शक्यतो पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी शूजमध्ये ग्रीप असलेलेच शूज खरेदी करावे.