Surabhi Jayashree Jagdish
जास्त वजन हे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराच्या झटक्यांसारख्या गंभीर आजारांशी संबंधित आहे. यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येतो आणि दीर्घकालीन आजारांचा धोका वाढतो. म्हणूनच वजन नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
अशा परिस्थितीत कोणत्या वयात वजन योग्य ठेवणे गरजेचे आहे, हा प्रश्न अनेकांना पडतो. उंची आणि वयानुसार आदर्श वजन किती असावे हे जाणून घेणं आवश्यक आहे.
यामुळे आरोग्य चांगले राखणे अधिक सोपे होते.
बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) हा उंची आणि वजनाच्या आधारे शरीरातील चरबीचे प्रमाण मोजण्याचा एक सोपा मार्ग आहे. तो आरोग्याची स्थिती समजून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. याच्या मदतीने आपण आपले वजन योग्य आहे की नाही हे ओळखू शकतो.
१८.५ ते २५ दरम्यानचा बीएमआय सर्वात योग्य मानला जातो. २५ ते ३० दरम्यान असल्यास तो जादा वजनाचे संकेत देतो. ३० पेक्षा जास्त असल्यास स्थूलता, तर १८.५ पेक्षा कमी असल्यास कमी वजन दर्शवतं.
उदाहरणार्थ, तुमचे वजन ५८ किलो आणि उंची १.६५ मीटर असेल. तर १.६५ × १.६५ करून त्याचा परिणाम ५८ ने भागावा. यातून मिळणारा आकडा म्हणजे तुमचा बीएमआय असतो.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशननुसार १९ ते ३९ वयोगटातील पुरुषांचे वजन साधारण ६५ किलो असावे. २०१० मध्ये हे प्रमाण सुमारे ६० किलो होते. २०२० नंतर यात सुमारे ५ किलोची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
एका अहवालानुसार १९ ते २९ वयोगटातील पुरुषांचे वजन ८३.४ किलो असावं. ३० ते ३९ वयोगटात हे ९०.३ किलो, तर ४० ते ४९ मध्ये ९०.९ किलो असावं. ५० ते ६० वयोगटातील पुरुषांसाठी हे प्रमाण सुमारे ९१.३ किलो मानलं जातं.