Sakshi Sunil Jadhav
अनेकदा जास्त आंबे खाल्ल्याने पोट बिघडू शकते. यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की, ही समस्या का उद्भवते आणि ती कशी टाळता येईल?
जर तुम्हालाही आंबे खाल्ल्यानंतर पोटदुखीचा त्रास होत असेल, तर त्यात दोष आंब्याचा नसून तो खाण्याच्या तुमच्या पद्धतीचा असतो.
आंब्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. त्यात फायबर आणि नैसर्गिक साखर भरपूर प्रमाणात असते.
एकाच वेळी जास्त आंबे खाल्ल्याने पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो. आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडसारख्या रसायनांचा वापर केला जातो.
ज्यामुळे पोटात जंतुसंसर्ग होऊ शकतो. मात्र हे कसं टाळता येईल यावर उपाय सांगणार आहोत.
आंबा खाण्यापूर्वी किमान १ ते २ तास थंड पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे आंब्यामधील अतिरिक्त उष्णता कमी होते आणि सालीतील हानिकारक रसायने देखील निघून जातात.
केवळ चवीसाठी एकाच वेळी खूप जास्त आंबे खाऊ नका. दिवसातून एक किंवा दोन आंबे खाणे सहसा पुरेसे असते.
नाश्त्यासोबत किंवा दुपारच्या जेवणासोबत खा. झोपण्यापूर्वी लगेच आंबे खाणे टाळा. कारण यामुळे पचनक्रियेत अडथळा येऊ शकतो. वजन वाढू शकते.
आयुर्वेदानुसार, आंबट आंबे दुधात मिसळू नयेत. पूर्ण पिकलेले आणि गोड आंबे शेकच्या स्वरूपात सेवन केले जाऊ शकतात. ज्यामुळे शरीराला थंडावा मिळतो.