Sakshi Sunil Jadhav
गुरु चाणक्यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टींवर लक्षकेंद्रीत केलं पाहिजे? याबद्दल अनेक चाणक्य नित्या लिहील्या.
चाणक्यांच्या मते, तुम्हाला पुढील तीन गोष्टीत समाधानी राहता आलं पाहिजे.
चाणक्यांच्या मते, नातेसंबंध, अन्न आणि संपत्ती यामध्ये जास्त लोभ ठेवू नका. यामध्ये समाधानी राहिल्याने आयुष्य शांत जगता येतं.
चाणक्यांच्या मते, शिक्षणात कधीही समाधानी राहू नका. सतत नव्या गोष्टी शिकत राहा.
स्वत:च्या व्यक्तीमत्वाच्या विकासासाठी आणि मानसिक बळ वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा.
समाजासाठी केलेलं दान आणि मदत हे फक्त इतरांचेच नाही तर स्वत: चही जीवन समृद्ध करतात.
वाईट मित्र आयुष्यात मोठं नुकसान करू शकतं. चांगले मित्र नसले तरी चालतील, पण चुकीच्या संगतीपासून दूर राहा.
चाणक्य सांगतात की, चुकीच्या आणि अन्यायी नेतृत्वाखाली राहण्यापेक्षा नेतृत्वाचा अभाव जास्त असू शकतो.
दुःख, गरिबी, अडचणी किंवा संकटाच्या काळात मदतीला धावून येणारी व्यक्तीच खरी हितचिंतक असते. अशा व्यक्तींशी नातं जपा.
चाणक्यांच्या मते, ज्ञानवान आणि प्रामाणिक व्यक्तींशी सत्य आणि प्रामाणिकपणे वागल्यावर त्यांचे मार्गदर्शन आणि विश्वास मिळतो.