Surabhi Jayashree Jagdish
आपल्या शरीर पाणी आणि टॉक्सिन्स हे लघवीद्वारे बाहेर टाकले जातात.
जेव्हा आपण जास्त पाणी पितो, तेव्हा किडनी त्याला स्वच्छ करून शरीरातील घाण बाहेर टाकते.
अनेक लोक कामात व्यस्त असल्यामुळे लघवी थांबवून ठेवतात, जे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.
जेव्हा लघवी बाहेर पडत नाही, तेव्हा त्यात असलेले बॅक्टेरिया शरीरातच राहतात.
लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्यास यूरिन इन्फेक्शन म्हणजेच UTI होण्याचा धोका वाढतो.
लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्याने किडनीमध्ये मिनरल्स साचू लागतात आणि हे साचून पुढे किडनी स्टोन तयार होऊ शकतात.
लांब काळ लघवी रोखून ठेवण्याच्या सवयीमुळे किडनीला हानी पोहोचू शकते.
लघवी दीर्घकाळ रोखल्याने किडनीचे स्नायू कमकुवत होतात. यामुळे लघवीवर नियंत्रण ठेवणं कठीण होतं.