Dhanshri Shintre
ट्रेक सुरू करण्यापूर्वी मार्गाची माहिती, हवामान अंदाज आणि ट्रेकची अडचीनिवारी माहिती मिळवा.
हवामानानुसार कपडे घालावेत आणि मजबूत, आरामदायक ट्रेकिंग शूज निवडावेत.
शरीर डिहायड्रेट होऊ नये म्हणून पाण्याची बाटली नेहमी जवळ ठेवा.
ड्रायफ्रूट्स, एनर्जी बार्स, किंवा हलका स्नॅक्स बरोबर ठेवा.
किरकोळ दुखापती किंवा आजारपणासाठी प्राथमिक उपचाराची तयारी ठेवा.
जंगल किंवा डोंगराळ भागात अंधार पडल्यानंतर वाट चुकण्याचा धोका असतो.
मार्ग चुकू नये म्हणून मोबाईलमध्ये GPS किंवा कागदी नकाशा सोबत ठेवा.
स्थानिक गावकऱ्यांचे नियम, सूचना पाळा आणि वन्यजीव किंवा वनस्पतींची हानी होणार नाही याची काळजी घ्या.