ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका स्वीकारली.
'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी कॅम्पवर हवाई हल्ले करण्यात आले.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी नागरिक मोठ्या संख्येने भारताबद्दल नवनवीन माहिती मिळवण्यासाठी अनेक गोष्टी गुगलवर सर्च करत आहेत.
पाकिस्तानमध्ये गुगलवर सर्वाधिक शोधले जाणारे कीवर्ड म्हणजे एआरवाय न्यूज लाईव्ह, लाहोर एअरपोर्ट, बीबीसी आणि इंडिया अटॅक ऑन पाकिस्तान.
पाकिस्तानी युजर्स 'इंडिया अटॅक बहावलपूर', 'इंडिया अटॅक ऑन पाकिस्तान टुडे', 'इंडिया स्ट्राइक्स पाकिस्तान' आणि 'इंडिया अटॅक्ड ऑन पाकिस्तान' असे कीवर्ड देखील मोठ्या प्रमाणात सर्च करत आहेत.
भारताच्या या लष्करी कारवाईला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले आहे. जे आता पाकिस्तानमध्येही एक लोकप्रिय कीवर्ड बनले आहे.
सामान्य नागरिकांपासून ते माध्यमांपर्यंत, सर्वजण या हल्ल्याबद्दल खूप सतर्क आहेत.आणि गुगल सर्चद्वारे भारताबद्दल प्रत्येक क्षणाची बातमी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.