ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बहुतेक लोक मेथीचे सेवन अनेक प्रकारे करतात. पण तुम्हाला माहित आहे का, कोणत्या लोकांनी मेथीच्या दाण्यांचे पाणी पिऊ नये. जाणून घ्या.
ज्या लोकांना लो शुगर लेव्हलचा त्रास असतो. त्यांनी मेथीचे पाणी पिऊ नये.
गर्भवती महिलांनी मेथीच्या दाण्याचे पाणी पिऊ नये. यामुळे गर्भाशयावर परिणाम होऊ शकतो.
ज्या लोकांना ब्लीडिंग डिसऑर्डर आहे. यांना मेथीच्या दाण्याचे पाणी पिणं टाळावं. यामुळे रक्त पातळ होऊ शकते.
जर तुम्हाला मेथीची एलर्जी आहे. तर मेथीच्या दाण्याच्या पाण्याचे सेवन करु नका. अन्यथा ही समस्या आणखी वाढू शकते.
लहान मुलांनी मेथीच्या दाण्याचे पाणी पिऊ नये. यामुळे त्यांच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो.
ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे. त्यांनी हे पाणी पिऊ नये. यामुळे बीपी लो होऊ शकतो.