ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पाकिस्तानी युजर्स गुगलवर भारतीय टेक्नॉलॉजी, बॉलिवूड आणि बेव सीरीजबद्दल सर्वाधिक सर्च करत आहेत.
पाकिस्तानातील क्रिकेटची क्रेझ गुगल सर्चवरही दिसून येते. गुगलवर २०२४चा टी- २० विश्वचषक, आणि २०२४चा PSL सर्वाधिक सर्च केला गेला.
पाकिस्तानी युजर्सनी, मुकेश अंबानी यांची संपत्ती, कंपनी संबधित माहिती तसेच त्यांच्या लाइफस्टाइलबद्दल मोठ्या प्रमाणात सर्च केले.
हिरामंडी, मिर्झापूर सीझन ३, आणि स्त्री २ सारख्या वेब सीरीज आणि चित्रपटांना देखील सर्च करण्यात आलं.
पाकिस्तानमध्ये चॅटजीपीटी, बिंग इमेज क्रिएटर, आयफोन १६ प्रो मॅक्स आणि रेडमी नोट १३ सारख्या टेक विषयांना देखील सर्च केले गेले.
'आजीच्या मृत्यूपूर्वी लाखो रुपये कसे कमावायचे', आणि 'गुंतवणुकीशिवाय श्रीमंत कसे व्हायचे' असे विचित्र प्रश्न देखील गुगलवर शोधण्यात आले.
पाकिस्तानी लोकांच्या गुगल सर्च लिस्टमध्ये फक्त मुकेश अंबानीच नाही तर इतर भारतीय सेलिब्रिटिचांही समावेश होता.