ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात दमट वातावरणात मोठ्याप्रमाणात बॅक्टेरिया निर्माण होत असतात. अशात खाण्या-पिण्यात थोडंसं दुर्लक्ष आपल्या आरोग्यावर बेतू शकतं.
पावसात बॅक्टेरिया तर वाढतोच पण पचनशक्ती देखील मंदावते. यामुळे पोटाच्या समस्या उद्भवतातम म्हणून खाण्या-पिण्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळे या गोष्टी खाणे टाळायला हवं.
आपल्या सर्वांना पावसाळ्यात चमचमीत स्ट्रिटफुड खायला आवडतं. पण याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आणि डेंग्यु-मलेरिया सारखे आजार उद्भवतात. यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
दुषित पाण्यामुळे टायफाईड होतो, फुड पॉयझन होण्याची शक्यता असते. पाणीपुरीमध्ये वापरले जाणारे पाणी दुषित असू शकते. यामुळे पाणीपुरी खाणे टाळावे.
पावसात सिजनल फळं खावीत पण बराचवेळ कापून ठेवलेली फळं खाणं टाळावं. दमट वातावरणामुळे त्यावर लगेच बॅक्टेरिया जमा होतो. शिवाय बाहेरील फ्रूट चाट तर नक्कीच खाऊ नये.
हिरव्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. पण पावसाळ्यात यावर किटाणू जमा होण्याचे प्रमाण जास्त असते.
दही आणि पनीर हे थंड पदार्थ असल्याने पचनास जड जाऊ शकतात. त्यामुळे ते कमी प्रमाणात खावे किंवा खाणे टाळावे.
पावसाळ्यात पचन क्रिया मंदावलेली असते. मसालेदार पदार्थ खाल्याने अपचन किंवा छातीत जळजळ होण्याची शक्यता असते.
दमट वातावरणात बॅक्टेरियामुळे अन्नावर बु्र्शी लवकर निर्माण होते. म्हणून शिळे अन्न खाणे टाळावे.