Dr. Babasaheb Ambedkar: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे कोणतं वाद्य वाजवण्याची कला होती?

Dhanshri Shintre

एखादं वाद्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संगीताची विशेष आवड होती, वाद्य शिकण्याची त्यांची तीव्र इच्छा होती.

राजकीय आणि सामाजिक कार्य

आयुष्यभर अपमान, भेदभाव आणि संघर्ष झेलून सामाजिक व राजकीय कार्यात स्वतःला वाहून घेतल्यामुळे त्यांना कधीही स्वतःसाठी काही करायला वेळ मिळाला नाही.

भेदभाव

डॉ. आंबेडकरांनी आयुष्यभर अन्याय, भेदभाव सहन करत समाजासाठी झगडले, त्यामुळे स्वतःच्या आवडी-निवडींसाठी त्यांना कधीच वेळ देता आला नाही.

व्हायोलिन

बळवंत साठे यांनी बाबासाहेबांना व्हायोलिन शिकवले आणि व्हायोलिन: हाऊ टू मास्टर इट हे पुस्तकही त्यांना भेट म्हणून दिले.

मधुमेहाची तीव्रता

साठीनंतर बाबासाहेबांना मधुमेहाची तीव्रता वाढली होती, त्यामुळे व्हायोलिन शिकताना त्यांना दीर्घकाळ शरीराने साथ देणे कठीण जात होते.

शरीराच्या त्रासांवर मात

थोडा वेळ व्हायोलिन वाजवल्यावर ते विश्रांती घेत, पुन्हा प्रयत्न करत. शरीराच्या त्रासांवर मात करत बाबासाहेबांनी अखेर व्हायोलिन शिकूनच दाखवलं.

संस्कृत शिकण्याची इच्छा

बाबासाहेब आंबेडकर अत्यंत जिद्दी होते. बालपणात संस्कृत शिकण्याची इच्छा अपूर्ण राहिली, पण मोठेपणी त्यांनी सामाजिक अडथळ्यांवर मात करून ती भाषा आत्मसात केली.

गरिबी आणि कठीण परिस्थिती

सामाजिक बंधनं नसूनही गरिबी आणि कठीण परिस्थितीमुळे बाबासाहेबांना आधी व्हायोलिन शिकता आलं नाही, पण शेवटच्या काळात त्यांनी तेही शिकून दाखवलं.

NEXT: शालेय शिक्षण ते उच्चशिक्षण; बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण कुठे कुठे झाले?

येथे क्लिक करा