Bharat Jadhav
10 रुपयांचे नाणे अनेक धातूंच्या मिश्रणातून बनवले जाते.
10 रुपयांच्या नाण्याचा बाहेरील भाग (पिवळा भाग) आणि मधल्या भागाचा रंग वेगळा आहे, त्यामुळे ते युनिक वाटतं.
10 रुपयांच्या नाण्याचा मध्य भाग कप्रो निकेलचा बनलेला आहे.
नाण्याची बाहेरील बाजू ॲल्युमिनियम कांस्यपासून बनलेली आहे.
10 रुपयांच्या नाण्याचे एकूण वजन 7.71 ग्रॅम आहे.
नाण्याच्या बाह्य वर्तुळाचे वजन 4.45 ग्रॅम आहे
नाण्याच्या मध्यवर्ती भागाचे वजन 3.26 ग्रॅम आहे.
नाण्याची ताकद आणि दीर्घायुष्य नाणं टिकावं यासाठी धातूचे मिश्रण तयार करून नाणं बनवण्यात आलंय.
10 रुपयांचे नाणे तयार करण्यासाठी 5.54 रुपये खर्च येतो.
10 रुपयांची नाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे जारी केली जातात आणि सिक्युरिटीज प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मुंबई, हैदराबाद, कोलकाता, नोएडा या चार टांकसाळीत तयार केली जातात.