Surabhi Jayashree Jagdish
पोटाचा कॅन्सर होण्याची सुरुवातीची लक्षणं सहसा खूप सामान्य असतात आणि ती इतर पोटाच्या समस्यांसारखीच वाटतात.
अनेकदा या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, ही लक्षणं दीर्घकाळ राहिली किंवा ती वाढत गेली, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे
ही लक्षणे अनेकदा पचनक्रियेच्या सामान्य समस्यांसारखी वाटतात, पण ती वारंवार दिसून येतात.
सतत अपचन होणं, जे औषधोपचारांनीही कमी होत नाही, हे एक महत्त्वाचं लक्षण असू शकते.
थोडेसे खाल्ल्यानंतरही पोट भरल्यासारखे वाटणे किंवा पोटात जडपणा जाणवणं हे देखील एक लक्षण मानलं जातं.
भूक कमी होणं किंवा जेवणाची इच्छा नसणं हे देखील पोटाच्या कॅन्सरचं लक्षण आहे
वारंवार मळमळ वाटणं किंवा कधीकधी उलटी होणं हे देखील पोटाच्या कॅन्सरचं लक्षण मानलं जातं.
पोटाचा कॅन्सर सुरु होण्यापूर्वी पोटाच्या वरच्या किंवा मधल्या भागात सतत किंवा तीव्र वेदना होण्याचा त्रास होतो.