भारतीयांनी दात घासण्यासाठी कशा प्रकारचा ब्रश निवडला पाहिजे?

Surabhi Jayashree Jagdish

टूथब्रशची निवड

भारतीय लोकांच्या दातांसाठी योग्य टूथब्रश निवडणे हे त्यांच्या दातांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

या गोष्टींकडे लक्ष द्या

टूथब्रश निवडताना तुम्ही कोणत्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे ते पाहूयात.

मऊ ब्रिस्टल्स

मऊ ब्रिस्टल्स दातांचे आणि हिरड्यांचे नुकसान न करता प्रभावीपणे प्लाक आणि अन्नाचे कण काढतात.

लहान ब्रश हेड

लहान ब्रश हेडमुळे तोंडातील सर्व भागांपर्यंत पोहोचणे सोपे होते, विशेषतः मागच्या दातांपर्यंत. यामुळे कोणतीही जागा स्वच्छ करायची राहून जात नाही.

हँडल

आरामदायक हँडलमुळे तुम्ही योग्य प्रेशरने ब्रश करू शकता आणि दात व्यवस्थित घासण्यास मदत होते.

ब्रिस्टलची रचना

क्रॉस-अँगल किंवा मल्टी-लेयर्ड ब्रिस्टल्स असलेला ब्रश वापरला पाहिजे.

वैयक्तिक गरज

जर तुमचे दात किंवा हिरड्या संवेदनशील असतील तर अल्ट्रा-सॉफ्ट ब्रिस्टल्स असलेला ब्रश वापरा.

Kandivali Tourism: लांब जाऊच नका! कांदिवलीमध्येच आहेत 'हे' Hidden Spots, या विकएंडला नक्की जाऊन या

Kandivali Tourism | saam tv
येथे क्लिक करा