Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर आहे.
मधुराणीने नुकतेच साडीतील तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
लाल रंगाच्या साडीत मधुराणीचं सौंदर्य खुललं आहे.
मधुराणीला ''तुझा आवडता रंग कुठला” असं विचारल्यावर ती क्षणाचा विचार नकरता बहाव्याचा सोनसळी रंग असं सांगते.
मधुराणी म्हणते, त्याच्या रंगांनी, त्याच्या दिसण्यानी त्याचा असण्यानी.. या तळपत्या उन्हात आपल्या डोळ्यांना किती सहज शांत करतो ना हा बहावा..
त्यात मी फुलं वेडी.. आणि हा फुलं वेडा असणारा ब्रांड.. आणि त्यातून बहरलेला हा आमचा बहावा… असं कॅप्शन देत मधुराणीने नवीन पोस्ट शेअर केली आहे.
मधुराणीच्या फोटोवर सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.