Saam Tv
वेगवान वाहनांवर स्वार व्हायला आज आवडेल. यावरूनच लांबचे प्रवास घडतील. चांगल्या वार्ता कानावर येतील. गणेश उपासना करावी.
पैशाचे महत्व आपल्यासाठी विशेष आहे. आज असाच अचानक धनलाभाचे योग आहेत. जोडीदाराकडून फायदा दिसतो आहे.
नव्याने सुरू होणारे वर्तमानपत्र, नियतकालिक, प्रिंटिंग व्यवसाय यामध्ये शुभारंभ करायला आज हरकत नाही. नव्या वाटा आज उपलब्ध होतील.
बाहेरचे पाणी पिण्यापासून आज सावधगिरी बाळगावी. पोटाशी निगडित आजार होतील. दिवस संमिश्र आहे.
पाठीचा कणा, हृदयाचे विकार यासाठी आज तब्येत जपावी लागेल. शेअर्स मध्ये गुंतवणूक चांगली ठरेल. रवी उपासना करावी.
द्विधा मनस्थिती टाळावी. आलेल्या परिस्थितीशी आज हसतमुखाने सामोरे जाल. भावनेपेक्षा बुद्धीला महत्त्व द्याल.
भावंडांकडून सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. प्रेमातून लाभ मिळतील. लहान प्रवासातून फायदा होईल.
मसालेदार आणि तिखट खाण्याची उर्मी आज येईल. नातेवाईकांबरोबर अंगत पंगत सजेल. पैशाचे योगाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.
आपले मूळचे उमदे व्यक्तिमत्व अजून उठून दिसेल. ठरवून गोष्टी कराल आणि त्यामध्ये यश मिळवाल. दिवस आनंदी आहे.
जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. व्यवसायिक भागीदारावरही पैसा खर्च होईल. दुपारनंतर महत्त्वाचे निर्णय घ्यावेत.
आनंदाला सीमा राहणार नाही. प्रसिद्धी सारख्या घटना घडतील. प्रेमात यश मिळेल. दिवस शुभ आहे.
"वाऱ्यावरती रंग पसरला" असा आजचा दिवस आहे. धावपळीमध्ये, कामामध्ये व्यस्त असाल. कामाचा आवाका वाढता राहणार आहे.