Manasvi Choudhary
वारी ही महाराष्ट्रातील ७०० ते ८०० वर्षापूर्वीची जुनी आणि सांस्कृतिक परंपरा आहे.
वारीमध्ये लाखो भक्त, भाविक पंढरपूरकडे चालत जातात ज्यांना वारकरी असे म्हणतात.
महाराष्ट्रात आषाढ शुद्ध एकादशीला आणि कार्तिकेला वारी काढली जाते. आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये होणारी वारी ही सर्वात मोठी आणि मुख्य वारी मानली जाते.
वारीमध्ये चालताना भक्त- भाविक 'ज्ञानबा-तुकाराम' आणि 'जय हरी विठ्ठल' असा नामघोष अखंड सुरू ठेवतात.
वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मतेचा वारसा जपते.
आषाढी एकादशीला महाराष्ट्रातून अनेक भावीक विठ्ठल- रूक्मिणीच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरला जातात त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे.
यंदा आषाढी एकादशी हिंदू दिनदर्शिकेनुसार, २५ जुलै २०२६ रोजी साजरी केली जाणार आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.