Surabhi Jayashree Jagdish
अमेरिकन स्पेस एजन्सी नासा पृथ्वीवरील सर्वात मोठ्या महासागरांवर संशोधन करत आहे. या प्रोजेक्टला ओशन एक्सप्लोरेशन मिशन असे नाव देण्यात आले आहे.
हे मिशन केवळ समुद्री जीवनाचे रहस्य उलगडण्यापुरते मर्यादित नाही, तर परग्रहवासीय जीवनाच्या शक्यतांवरही सतत लक्ष केंद्रित करत आहे.
मिशन अंतर्गत समुद्राच्या सर्वात खोल भागावर संशोधन केले जाणार आहे, ज्यामुळे तिथल्या जीवनाच्या उत्पत्तीशी संबंधित माहिती मिळू शकते.
याठिकाणी अत्यंत दाब, कमी तापमान आणि ऑक्सिजनची कमतरता अशा मोठ्या अडचणी आहेत. नासाचे शास्त्रज्ञ अशा जीवांचा आणि सूक्ष्मजीवांचा शोध घेत आहेत जे या कठीण परिस्थितीतसुद्धा जिवंत राहतात.
या मिशनसाठी नासाने अत्याधुनिक रोबोटिक्स आणि सेन्सर्स जसे की, आरओव्हीएस विकसित केले आहेत. ही तंत्रज्ञान प्रणाली केवळ समुद्रातील संशोधनासाठीच नाही तर अवकाश मोहिमांसाठीही उपयोगी ठरणार आहे.
या मिशनचा पुढचा टप्पा म्हणजे चंद्रावर आणि इतर ग्रहांवर आढळणाऱ्या महासागरांची तपासणी करणे, जेणेकरून त्यांची तुलना पृथ्वीवरील महासागरांशी करता येईल.
या मोहिमेमुळे समुद्रात असलेल्या खनिज संसाधनांची संभाव्य उपलब्धता देखील शोधली जाईल, ज्यामुळे भविष्यात पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधनांची गरज भागवता येईल.