ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांना सापांची खूप भीती वाटते. कारण काही साप विषारी असतात, तर काही विषारी नसतात. परंतु सापाच्या विषाचा वापर काही विशेष गोष्टींसाठी केला जातो.
सापाचे विष खूप घातक असते. आणि याचा वापर अनेक गोष्टीमध्ये केला जातो.
आज, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, सापाच्या विषाचा उपयोग कशासाठी केला जातो.
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, सापाच्या विषापासून औषध बनवले जातात.
या औषधांचा वापर हृदयाशी संबधित आजारांसाठी केला जातो.
अलझायमर रोगाच्या उपचारासाठी देखील सापाच्या विषापासून बनलेल्या औषधांचा वापर केला जातो.
सापाच्या विषापासून बनवलेले औषध हाय ब्लड प्रेशरवर उपचार करण्यासाठी वापरले जातात.