Manasvi Choudhary
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात पाऊलं उचलली आहे.
भारत - पाक युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
अशातच केंद्रीय गृहमंत्रालयाने आज सर्व राज्यांना मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत.
मॉक ड्रिल हे २४४ जिल्ह्यांमध्ये होणार आहे.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना हवाई हल्ल्याच्या सायरनला कसे प्रतिसाद द्यायचे, तसेच ब्लॅकआऊट परिस्थिती कशी हाताळायची याचे प्रशिक्षण दिले जाईल.
मॉक ड्रिल सायंकाळी होणार आहे. प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट देण्यात आला आहे.
ब्लॅकआउटदरम्यान लाईट पूर्णत: बंद राहणार आहे. अनेक भागात वीजपुरवठा खंडीत होईल.