ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुंबईतले सर्वात प्रसिद्ध म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. तिथे परदेशी पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने पर्यटनाला येत असतात. मात्र या ठिकाणाचा मुख्य आणि रंजक इतिहास कोणालाच माहीत नाही. चला तर जाणून घेऊ.
गेटवे ऑफ इंडिया हे ब्रिटीश वास्तुविशारद जॉर्ज विवेट यांनी डिजाईन केले होते.
ब्रिटनचे राजा राणी भारतात येणार हे ठरल्यावर त्यांच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया उभारण्यात आले.
जेव्हा गेटवे ऑफ इंडिया बांधण्याचे ठरले होते तेव्हा तब्बल २१ लाख रुपये खर्च करण्यात आले होते.
गेटवे ऑफ इंडियामध्ये असलेल्या जाळ्या ग्वाल्हेर येथून आणल्या.
गेटवे ऑफ इंडियाने स्वातंत्र्यापुर्वीपासूनच्या हालचाली पाहिल्या होत्या त्यामुळे एका शतकानंतर तेथे एक फलक लावून महात्मा गांधी आणि कस्तुरबा यांच्या परतण्याची कहाणी लिहिली गेली.