ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
श्रीकृष्णाचा आवडता महिना यंदा २ डिसेंबरपासून सुरू झाला आहे. या महिन्यात महिला श्रावण महिन्यासारखा उपवास ठेवून घरात घट बसवतात.
हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष हा नववा महिना असतो. या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी मातेसाठी खास व्रत वैकल्य केले जाते.
मार्गशीर्षमध्ये महिला भद्रश्रवणाच्या कथेचे पठण करतात. तसेच देवीची पुजा आणि मंत्राचा जप करतात.
पुजेच्या दिवशी महिला घट बसवात, उपवासना करतात, पुजा करतात, नैवेद्य तयार करतात. चला तर जाणून घेऊ यंदाचे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार कधी आणि किती आहेत?
पहिला मार्गशीर्षचा गुरुवार ५ डिसेंबर २०२४ रोजी आहे.
दुसरा मार्गशीर्षचा गुरुवार १२ डिसेंबर २०२४ रोजी आहे.
तिसरा मार्गशीर्षचा गुरुवार १९ डिसेंबर २०२४ रोजी आहे.
चौथा मार्गशीर्षचा गुरुवार २६ डिसेंबर २०२४ रोजी आहे.