ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे फिरण्यासाठी तुम्हाला सगळ्यात जास्त पैसे लागत नाहीत.
आता नुकताच डिसेंबर महिना सुरु झाला आहे. या थंडीत तुम्ही फिरण्याचा प्लॅन करत असाल तर पुढील ठिकाणे स्वस्तात मस्त पर्यटनासाठी आहेत.
सुट्टीच्या दिवसांमध्ये तुम्ही प्रसिद्ध ठिकाणी म्हणजेच शिमला या ठिकाणाला भेट देऊ शकता. तिथे तुम्हाला बजेटमध्ये राहण्याची सोय मिळेल.
गोवा हे सगळ्यात सुंदर आणि गोवन फुड्ससाठीचे प्रसिद्ध ठिकाण आहे. तिथे तुम्ही समृद्र किनाऱ्यावर सहज प्रवेश करू शकता.
जयपूर हे अंबर किल्ला, हवा महाल, सीटी पॅलेस आणि रंगीबेरंगी ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे जाण्यासाठी तुम्हाला काहीच खर्च करावा लागत नाही.
तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडत असेल तर तुम्ही मुन्नार या ठिकाणाला भेट देऊ शकता. तिथे असणाऱ्या चहाच्या बागांमध्ये तुम्ही सहज फिरू शकता.
लोकप्रिय असलेले आग्रा हे ठिकाण गुलाबी थंडीत धुक्याची चादर आढल्यासारखं दिसतं. इथे तुम्ही कमी बजेटमध्ये राहू शकता.