Saam Tv
अनेक जण वजन कमी करण्यासाठी विविध पर्याय निवडत असतात.
बरीचशी मंडळी त्यामध्ये कमी जेवण्याचा आणि जास्त काळ उपाशी राहण्याचा पर्याय निवडतात.
हे सत्य की वजन कमी करण्यासाठी जेवण कमी करणे आवश्यक असते. मात्र त्यासोबत काही मह्त्वाची माहिती समजून घ्या.
तुम्ही रोजच्यापेक्षा कमी आहार घेतला की कमी कॅलेरीच तुमच्या शरीरात जातात.
कमी कॅलेरीजमुळे तुमचे वजन कमी होऊ लागते.
कमी कॅलेरीजमुळे तुम्हाला विविध समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
तुम्ही जितका पोषक आहार घेता. तितके तुमच्या शरीराला आवश्यक असणारे प्रथिने, जीवनसत्वेृ, खनिजे मिळतात.
जर पुरेशी जीवनसत्वे मिळाली नाहीत तर, केस गळणे, थकवा, रोगप्रतिकारशक्ती कमी असे दुष्परिणाम दिसू लागतात.
दिवसभरात थोडं थोडं पण पौष्टिक खाणं, साखर आणि तेल कमी करणं. तसेच दररोज थोडा वेळ चालणं किंवा योगा करणं.