Manasvi Choudhary
पायलट होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पायलट हे अत्यंत जबाबदारीचे करिअर असते.
पायलट होण्ययासाठी केवळ शिक्षण महत्वाचे नाही तर तुम्हाला तांत्रिकदृष्ट्या आणि मानसिक रित्या हुशार असणे महत्वाचे आहे.
वैमानिकाचा पगार हा त्याच्या अनुभवावर अंबलबून असतो तुम्ही कोणत्या संस्थेमध्ये कार्यरत आहात हे देखील महत्वाचे आहे.
वैमानिकांचा पगार हा प्लाइंग अवर्स, अनुभव, देशाअंतर्गत किंवा आंतराष्ट्रिय विमान उडवणे, रँक यावर अवलंबून असतो.
एअर इंडिया, इंडिगो आणि विस्तारा यासारंख्या नामांकित अनुभवी कंपन्या दरमहा ८ ते १२ लाख रुपयांपर्यंत पगार देतात.
वैमानिकाचा पगार तो महिन्यात किती तास विमान उडवतो यावरही अवलंबून असतो. एका ठराविक तासांनंतर जास्तीच्या उड्डाणासाठी 'ओव्हरटाईम' किंवा बोनस दिला जातो.