Manasvi Choudhary
मानवी शरीर हे एका यंत्रणासारखे काम करते यासाठी शरीराला योग्य वेळी योग्य आहाराची आवश्यकता असते.
सकाळपासून ते रात्रीपर्यंत प्रत्येक वेळेनुसार आहार करणे महत्वाचे आहे. नाश्ता करण्याची योग्य वेळ कोणती हे आज आपण जाणून घेऊया.
सकाळी नाश्ता केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते व शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते.
सकाळी ७ ते ८ ही नाश्ता करण्याची योग्य वेळ मानली जाते मात्र अनेकजण यावेळी नाश्ता करू शकत नसल्याने १० वाजण्यापूर्वी नाश्ता करावा.
शास्त्रज्ञांच्यामते, जर तुम्ही उशीरा उठत असल्यास तर उठल्यानंतर एक तासाच्या आत नाश्ता करावा.
रात्रीच्या जेवणानंतर ८ तासाचा गॅपमुळे शरीराला उर्जेची गरज असते शरीरातील ग्लुकोजची पातळी देखील कमी झालेली असते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.