Blood Pressure Medicine: ब्लड प्रेशरवरील औषधं घेण्याची योग्य वेळ कोणती? कार्डियोलॉजिस्टने सांगितली आश्चर्यचकित करणारी माहिती

Surabhi Jayashree Jagdish

ब्लड प्रेशरची औषधं

उच्च रक्तदाबाचा म्हणजेच ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या अनेकांना औषधं घेण्याची योग्य वेळ कोणती, असा प्रश्न पडतो. न्यूयॉर्कमधील कार्डियोलॉजीस्ट डॉ. लेव्हिन यांनी एका व्हिडिओमध्ये याबाबत माहिती दिलीये.

Blood Pressure Medication Timing | saam tv

औषधं घेण्याची वेळ महत्त्वाची

ब्लड प्रेशरची औषधं नियमित घेतल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि किडनीच्या आजारांचा धोका कमी करण्यास मदत होते. सकाळी किंवा रात्री औषधं घेण्यामुळे उपचारांच्या परिणामांमध्ये फरक पडू शकतो.

Morning BP Medication | saam tv

डॉ. लेव्हिन काय सल्ला देतात?

डॉ. लेव्हिन यांच्या मते, औषधं ज्या वेळी सहज लक्षात राहतील त्या वेळी घेण्याची सवय लावावी. जसं की, सकाळी दात घासल्यानंतर औषधं घेता येतील, अशा ठिकाणी औषधांची बाटली ठेवता येते. औषधं घेण्याचं विसरल्यास रक्तदाब नियंत्रणात ठेवणं कठीण होऊ शकतं, त्यामुळे सकाळ, दुपार किंवा संध्याकाळ यांपैकी योग्य अशी वेळ निवडावी.

BP Medicine Timing | saam tv

संशोधनातून काय समोर आलं?

पूर्वी काही संशोधनांमध्ये रात्री औषधं घेतल्यामुळे सकाळच्या वेळी रक्तदाब वाढण्यावर अधिक चांगलं नियंत्रण मिळू शकतं, असं लक्षात आलं होतं. मात्र, TIME या अभ्यासात सकाळी आणि संध्याकाळी औषधं घेणाऱ्या रुग्णांच्या आरोग्याच्या परिणामांमध्ये महत्त्वाचा फरक आढळला नाही. त्यामुळे औषधं सकाळी घ्यायची की रात्री यापेक्षा ती नियमित घेण्याला प्राधान्य द्यावं.

Hypertension Medicines | saam tv

औषधांचा प्रकार

डॉ. लेव्हिन यांच्या मते, शक्य असेल तेव्हा दिवसातून एकदाच घ्यावं लागणारं औषध रुग्णांसाठी सोयीचं ठरू शकतं. दिवसातून दोन किंवा तीन वेळा औषधं घ्यावी लागल्यास काही रुग्ण डोस विसरू शकतात, तर औषधांच्या सूचना समजण्यातही गोंधळ होऊ शकतो.

Kidney Disease Risk | saam tv

डॉक्टरांचा सल्ला

काही व्यक्तींचा रक्तदाब रात्री झोपेतही पुरेसा कमी होत नाही अशा व्यक्तींना डॉक्टर विशिष्ट कारणांसाठी रात्री औषधं घेण्याचा सल्ला देऊ शकतात. त्यामुळे औषधं घेण्याची वेळ स्वतःहून बदलू नका किंवा औषधं बंद करू नका.

Daily BP Medication | saam tv

Tyre expiry date: वाहनांच्या टायरची एक्सपायरी डेट काय असते? जाणून घ्या

DOT tyre code | saam tv
येथे क्लिक करा