Saam Tv
योग्य वेळी योग्य आहार घेतल्याने शरीराला कोणत्याच समस्यांना सामोरे जावे लागत नाही.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'परिक्षा पे चर्चा' दरम्यान विद्यार्थ्यांशी खाण्याच्या योग्य वेळेबद्दल संवाद साधला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, सकाळी ८.३० वाजता नाश्ता करावा.
तसेच दुपारचे जेवण १२ ते २ या वेळेत करावे.
तर संध्याकाळी याशिवाय सुर्यास्तापुर्वी रात्रीचे जेवण करण्याचा सल्ला सुद्धा त्यांनी दिला.
रात्रीचे जेवण रात्री न करता संध्याकाळी ७ ते ८ च्या आत करावे.
संध्याकाळी लवकर जेवल्याने पचनसंस्थेला अन्न पचविण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही.