Manasvi Choudhary
उन्हाळ्यात आंबा खाण्याची मज्जा वेगळीच असते. लहानपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच आंबा खायला आवडतो.
अनेकजण आंबा खाताना चुका करतात यामुळे आरोग्याला धोका पोहोचतो. चुकीच्या वेळी आंबा खाल्ल्याने आरोग्याचा समस्या निर्माण होऊ शकतात.
जेवल्यानंतर आंबा खाण्याची अनेकांना सवय असते. मात्र जेवल्यानंतर आंबा खाणं कितपत योग्य आहे, हे जाणून घ्या.
सकाळी रिकाम्यापोटी फळं खाणं आरोग्यासाठी योग्य मानले जाते.दुपारी जेवल्यानंतर आंबा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
रात्री जेवल्यानंतर आंबा खाणे टाळावे कारण यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो तसेच वजन देखील वाढू शकते.
आंबा उष्ण पदार्थ असल्याने पोटातील उष्णता किंवा अॅसिडीटी झाली असेल तर तुम्ही आंबा खाणे टाळावे.
मधुमेहाच्या व्यक्तींना आंबा योग्य प्रमाणात खावे कारण यातील साखरेचे प्रमाण शरीरासाठी घातक ठरू शकते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.