Mothers Day Saree Gifts: 'मदर्स डे' निमित्त आईला गिफ्ट द्या सुंदर साड्या, 'या' 10 डिझाईन्स ट्रेडिंगमध्ये

Manasvi Choudhary

मदर्स डे

आज सर्वत्र मदर्स डे साजरा होणार आहे. मदर्स डे निमित्त तुम्ही आईसाठी आज खास भेटवस्तू देऊन आई दिन साजरा करू शकता.

Mothers Day Saree Gifts

नवीन डिझाईन्सच्या साड्या

साडी आणि महिला हे समीकरण तुम्हाला माहितीच असेल. आज मदर्स डे निमित्त तुम्ही नवीन डिझाईन्सच्या साड्या भेटवस्तू म्हणून देऊ शकता.

Mothers Day Saree Gifts

प्रिटेंड साडी

प्रिटेंड साड्या या महिलांना नेहमीच आवडतात. हलक्या आणि युनिक डिझाईन्सच्या या साड्या नेसल्या की आरामदायी वाटतात.

Mothers Day Saree Gifts

कलमकारी साड्या

कलमकारी साड्या या महिलांना स्टायलिश वाटतात. सिंपल डिझाईनच्या या साड्यांची बॉर्डर मोठी असते म्हणून या साड्या महिलांना अधिक आवडतात.

Kalamkari Saree

पैठणी साडी

पैठणी हा साडीचा सर्वात जुना आणि रॉयल प्रकार आहे. विविध डिझाईनच्या नक्षीच्या या पैठणी साड्या कायमच ट्रेंडमध्ये असतात.

Paithani Saree

कॉटनच्या साड्या

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. यानिमित्त तुम्ही कॉटनच्या साड्या खास घेऊ शकता. जयपुर ब्लॉक प्रिंट, कलमकारी आणि बागा प्रिंट कॉटन साड्या रोजच्या वापरासाठी लोकप्रिय आहेत.

Cotton Saree Designs | pinterest

सॅटीन साडी

तुम्हाला खास पार्टीलूकसाठी साडी हवी असेल तर तुम्ही सॅटीनच्या चकाकणाऱ्या साड्या गीफ्ट म्हणून देऊ शकता.

Satin Saree Designs

डिजीटल प्रिटेंड साड्या

आजकाल डिजीटल प्रिटेंड साड्यांचा ट्रेंड आहे. तुम्ही आईसाठ डिजिटल प्रिटेंड साडी खरेदी करू शकता, अनेक डिझाईनमध्ये या साड्या असतात.

Printed Saree

मलमल किंवा चंदेरी सिल्क साडी

मलमल किंवा चंदेरी सिल्क साड्या हलक्या असतात या तुम्ही खास मदर्स डे निमित्त भेट म्हणून देऊ शकता.

Chanderi Saree Types

NEXT: Thalapathy Vijay Family Photo: तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलापती विजय यांच्या कुटुंबात कोण कोण आहे? जाणून घ्या त्यांच्या परिवाराविषयी

येथे क्लिक करा...