ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. काकडी खाण्याची योग्य वेळ माहितीये का, जाणून घ्या.
काकडीमध्ये ९० टक्के पाणी असते. यामुळे काकडी शरीराला थंडावा देण्यासह हायड्रेट ठेवण्याचे देखील काम करते.
परंतु, रात्री काकडीचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते.
काकडी शरीरासाठी थंड असते. यामुळे झोपण्यापूर्वी काकडी खाल्ल्याने सर्दी खोकला होण्याची शक्यता वाढते.
रात्री काकडीचे सेवन केल्याने पचनाशी संबधित समस्या होऊ शकतात. जसे की, अॅसिडिटी, गॅस आणि पोट फुगणे.
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे रात्री लघवीला जाण्याचे प्रमाण वाढू शकते. यामुळे झोपेमध्ये व्यत्यय येतो.
रात्री काकडी खाल्ल्याने सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो. तसेच सूज देखील येऊ शकते.