Manasvi Choudhary
ब्लॅक कॉफी प्यायची योग्य वेळ तुम्हाला माहित असणं महत्वाचे आहे.चुकीच्या वेळी ब्लॅक कॉफी प्यायल्याने फायद्याऐवजी तुम्हाला नुकसान होऊ शकते.
ब्लॅक कॉफी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी प्यायल्याने पोटात ॲसिडिटी, जळजळ आणि पोट फुगण्याची समस्या होऊ शकते.
सकाळी हलका नाश्ता केल्यानंतर किंवा सकाळी १०:०० ते ११:०० वाजता ब्लॅक कॉफी पिणे सर्वात उत्तम मानले जाते.
जिम किंवा व्यायाम करत असाल तर २० ते ३० मिनिटे आधी एक कप ब्लॅक कॉफी पिणे फायदेशीर ठरेल .
दुपारच्या जेवणानंतर १ किंवा २ तासांनी ब्लॅक कॉफी पिणे फायदेशीर ठरते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.