Manasvi Choudhary
करडई ही पावसाळ्यात मिळणारी अत्यंत पौष्टिक भाजी आहे. करडईची भाजी तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने बनवू शकता.
करडई भाजीमध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी हे पौष्टिक घटक असतात.
करडई भाजी अत्यंत चवदार लागते. करडई भाजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे तुम्ही घरच्या घरी ही रेसिपी बनवू शकता.
भाजी बनवण्यासाठी करडई, बेसन , शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, लसूण, मीठ, तेल हे साहित्य घ्या.
सर्वातआधी करडई भाजीची कोवळी पाने स्वच्छ निवडून धुवून घ्या.
गॅसवर कढईत गरम तेलामध्ये हिरवी मिरची आणि ठेचलेला लसूण याची चांगली फोडणी द्या.
नंतर या मिश्रणात बारीक चिरलेली भाजी मिक्स करा. भाजीत थोडेसे पाणी मिक्स करून चांगली शिजवून घ्या.
भाजी शिजली की त्यात शेंगदाण्याचा कूट मिक्स करा आणि भाजी चांगली परतून घ्या.
अशाप्रकारे घरच्या घरी करडईची गावरान स्टाईल भाजी तयार होईल.