Manasvi Choudhary
लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक आहे.
सायलीने तिच्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत नाव कमावलं आहे.
सायली संजीव आणि अशोक सराफ यांच्या नात्याची कायमच चर्चा असते.
सायली संजीव ही अशोक सराफ यांना पप्पा या नावाने बोलते. यामागचं कारण नेमकं काय आहे ते जाणून घेऊया.
सायली संजीव ही तिच्या वडिलांना बाबा म्हणते आणि यामुळेच अशोक सराफ यांनी तिला बाबा नाही तर पप्पा म्हणण्यास सांगितले.
काहे दिया परदेस या मालिकेमुळे अशोक सराफ हे सायलीला त्यांची मुलगी मानू लागले.
काहे दिया परदेस या मालिकेतील माझी भूमिका पाहून अनेकांनी मी निवेदिता सराफ यांची कॉपी असल्याचं म्हटलं.
यानंतर सर्वीकडे सायली ही निवेदिता सराफ यांची मुलगी असल्याचं समजलं मात्र माझा आणि त्यांचा काही संपर्क नव्हता असं तिने एका मुलाखतीत सांगितले होते.
यानंतर अशोक सराफ हे देखील ९ वाजता काहे दिया परदेस ही मालिका पाहू लागले.