Manasvi Choudhary
लग्नानंतर तुझ्यात बदल झाला आहे, असं तुम्ही कोणाच्यातरी मुखातून ऐकलेच असेलच. फार पूर्वीपासून असं म्हटलं जातं.
लग्नानंतर महिलांच्या स्वभावात अचानक बदल झालेला दिसून येतो यामागची कारणे आता समोर आली आहेतत
लग्नानंतर अनेक नवीन जबाबदाऱ्या असतात यामुळे महिला ही जबाबदारीने वागत असते त्यामुळे तुम्हाला तिच्या स्वभावात बदल दिसतो.
ऑफिस व घरातील कामे अश्या अनेक जबाबदाऱ्या तिच्याकडे असतात यामुळे स्वभावात बदल होऊ शकतो कधी शांतता तर कधी ताण येऊ शकतो.
लग्नानंतरच्या शारीरिक संबंधांमुळे महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात. ज्याचा परिणाम स्वभाव आणि मूडवर दिसून येतो.
नवीन लोकांच्या आवडीनिवडीनुसार स्वतःला बदलणे, स्वतःच्या ज्या सवयीं असतात त्यांना थांबवणे यामुळे अनेकदा बदल झालेला दिसून येतो.
लग्नापूर्वी महिलांना स्वतःच्या छंदांसाठी, मित्रांसाठी आणि विश्रांतीसाठी भरपूर वेळ मिळतो. लग्नानंतर संपूर्ण वेळ कुटुंबासाठी द्यावा लागतो.
लग्नाआधी कोणतेही निर्णय आई बांबा घ्यायचे मात्र लग्नानंतर मोठमोठे निर्णय घ्यावे लागतात यामुळे बदल जाणवतो.