Ruchika Jadhav
उचकी लागण्याची समस्या फार सामान्य आहे. अनेक व्यक्तींना विविध कारणांमुळे उचकी लागते.
जुनी माणसे आजही उचकी लागल्यावर कोण तरी आठवण काढत असणार असं म्हणतात.
जेवताना एखादा मोठा घास पटकन गिळल्यामुळे अन्नाचा एखादा कण आपल्या अन्ननलिकेत अडकतो, त्यामुळे उचकी लागते.
उचकी लागण्याची अन्य कारणे, डचकणे, भीती वाटणे आणि मानसिक भय हे देखील आहे.
ज्या व्यक्तींना जास्त तिखट जेवण केल्यावर किंवा चुकून मिरची खाल्ल्यावर सुद्धा उचकी लागते.
मद्यपान किंवा धूम्रपान करत असलेल्या व्यक्तींना देखील उचकी लागते.
काही व्यक्तींना धूर, धुळ यांसह सेंट तसेच विविध स्मेलची एलर्जी असते. त्यामुळे त्यांना उचकी लागते.