Dhanshri Shintre
तिबेटी धर्मगुरू दलाई लामा ६ जुलैला ९० वर्षांचे होतील आणि त्या दिवशी पुढील दलाई लामाची निवड प्रक्रिया स्पष्ट करतील.
सध्याचे दलाई लामा अवघ्या २ वर्षांचे असताना त्यांना मागील दलाई लामांचा पुनर्जन्म मानले गेले आणि धार्मिक नेते घोषित करण्यात आले.
दलाई लामा हे तिबेटी बौद्ध धर्माचे सध्या १४ वे आध्यात्मिक गुरू असून जगभरात त्यांना शांततेचा प्रतीक म्हणून ओळखले जाते.
दलाई लामा हे त्यांचे मूळ नाव नाही, ही गोष्ट फारच थोड्या लोकांना माहीत आहे. चला समजून घेऊया.
सध्याचे दलाई लामा यांचे खरे नाव तेन्झिन ग्यात्सो आहे. वयाच्या २व्या वर्षी निवड, तर ४व्या वर्षी शिक्षणासाठी ल्हासाला नेले.
‘दलाई लामा’ हे खरे नाव नसून एक धार्मिक पदवी आहे. उदाहरणार्थ, तेन्झिन ग्यात्सो हे या पदाचे १४ वे धारक म्हणून ओळखले जातात.
तिबेटी बौद्ध धर्माचे आध्यात्मिक प्रमुख दलाई लामा दया, करुणा, अहिंसा आणि ज्ञान यांना जीवनातील मूलमंत्र मानतात.
बौद्ध धर्मगुरू असले तरी दलाई लामांचे विचार सर्व धर्म आणि संस्कृतींना स्पर्श करणारे, प्रेरणादायक मानले जाते.