Surabhi Jayashree Jagdish
इंडिया गेटचं बांधकाम 1921 मध्ये सुरू झालं आणि 1931 मध्ये पूर्ण झाले.
इंडिया गेटची रचना प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुविशारद सर एडविन लुटियन्स यांनी केली होती.
12 फेब्रुवारी 1931 रोजी तत्कालीन व्हाइसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्या हस्ते इंडिया गेटचं उद्घाटन करण्यात आलं होतं.
पहिल्या महायुद्धात आणि तिसऱ्या अफगाण युद्धात प्राण गमावलेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ हा इंडिया गेट बांधला गेला होता.
इंडिया गेट हे जगातील सर्वात मोठं युद्ध स्मारक असून त्याची उंची 42 मीटर आहे.
इंडिया गेटवर १३३१३ हुतात्म्यांची नावं कोरली असून त्यापैकी १२३५७ भारतीय सैनिक आहेत आणि उर्वरित ब्रिटिश सैनिक आहेत.
इंडिया गेटचं खरं नाव काय आहे हे तुम्हाला माहीतीये का? इंडिया गेटचं खरं नाव ऑल इंडिया वॉर मेमोरियल असं आहे.