Surabhi Jayashree Jagdish
अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. गरम चहा पिण्याची अनेकांना सवय असते. त्यामुळे चहा थंड झाला की ते पुन्हा गरम करून पितात.
मात्र चहा पुन्हा पुन्हा उकळून प्यायल्यास शरीरात काय बदल किंवा परिणाम होतात हे पाहूयात.
डॉक्टरांच्या मते, 4 तास किंवा त्याहून अधिक वेळ राहिलेला चहा पुन्हा गरम करणं आणि पिणं यामुळे लोकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
चहा पुन्हा गरम करून प्यायल्याने त्यात असलेले पोषक घटक नष्ट होतात आणि त्यात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यताही वाढते.
चहा पुन्हा गरम करून प्यायल्याने लोकांच्या आतड्यांवर आणि पचनावर वाईट परिणाम होतो. यामुळे लोकांना इन्फेक्शन, गॅस आणि ॲसिडिटीसारख्या समस्या जाणवू शकतात.
चहा पुन्हा गरम केल्यावर प्यायल्याने लोकांना मळमळ, उलट्या आणि डोकेदुखी यासारखा त्रास होऊ शकतो
पुन्हा गरम केलेला चहा प्यायल्याने लोकांमध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका वाढतो.
रिझर्व्ह बँकेच्या बाहेर असलेल्या मूर्ती कोणाच्या आहेत?