Saam Tv
सकाळच्या नाश्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो.
तुम्ही नाश्त्याला मसाला ओट्स हा पर्याय निवडू शकता. यामधून तुमच्या शरीराला हेल्दी आणि पौष्टीक गुणधर्म मिळू शकतात.
ओट्स, बारिक केलेल्या विविध भाज्या, कणीस, हिरव्या मिरच्या, आलं, हळद, कोथिंबीर, मीठ, तेल, लाल तिखट, लसुण पावडर, गरम मसाला इ.
सर्वप्रथम एका कढईत १ चमचा तेल गरम करा. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, गाजर, मटार, बीन्स आणि लसूण पावडर छान परता.
आता मिश्रणात सगळे मसाले घालून परतून घ्या.
आता त्यामध्ये वाटीभर पाणी आणि ओट्स घालून ढवळत राहा.
आता हे मिश्रण उकळेपर्यंत ढवळत राहा.
ओट्स सुकले की त्यामध्ये मीठ आणि आवडत असल्यास काळी मिरी पावडर घाला.
आता गॅस बंद करून त्यावर कोथिंबीर घाला आणि गरमा गरम ओट्स सर्व्ह करा.