PAN Card: 2 पॅनकार्ड असल्यास काय शिक्षा होऊ शकते?

Surabhi Jayashree Jagdish

पॅन कार्ड

पॅन कार्ड हे प्रत्येक व्यक्तीची आर्थिक ओळख मानलं जातं. त्यामुळे एका व्यक्तीला आयुष्यात फक्त एकच पॅन कार्ड दिलं जातं. याचा वापर बँकिंग आणि करसंबंधित कामांसाठी होतो.

Duplicate PAN Card | saam tv

दोन पॅन कार्ड

जर एखाद्या व्यक्तीकडे दोन पॅन कार्ड आढळलं तर ते कायद्याने चुकीचं मानलं जातं. आयकर विभाग याला गंभीर नियमभंग समजतो. अशा प्रकरणांमध्ये कारवाई होऊ शकते.

PAN Card Penalty | saam tv

आर्थिक दंड

दोन पॅन कार्ड ठेवल्यास आर्थिक दंड भरावा लागू शकतो. आयकर कायद्यानुसार 10 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. म्हणून अतिरिक्त पॅन कार्ड तातडीने बंद करण आवश्यक आहे.

Income Tax Department | saam tv

टॅक्स चोरी

जर या प्रकरणात टॅक्स चोरी सिद्ध झाली तर अडचणी आणखी वाढू शकतात. अशा वेळी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते.

Tax Rules India | saam tv

कठोर शिक्षा

फसवणुकीचा हेतू असल्याचे सिद्ध झाल्यास कठोर शिक्षा दिली जाते. अशा परिस्थितीत 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. यामुळे आर्थिक आणि सामाजिक दोन्ही नुकसान होऊ शकते.

Multiple PAN Cards | saam tv

नेत्याला शिक्षा

यासंदर्भातील एका प्रकरणात समाजवादी पक्षाचे एक नेते आणि त्यांचा मुलगा

यांना 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

PAN Card Fraud | saam tv

आर्थिक व्यवहारांमध्ये अडथळे

एका व्यक्तीकडे दोन पॅन कार्ड असल्यास आर्थिक व्यवहारांमध्ये अडथळे येऊ शकतात. लोन मंजूर होणं किंवा नवीन क्रेडिट कार्ड मिळणं कठीण होतं.

Tax Evasion | saam tv

Weak heart signs: पायांमध्ये ही २ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय कमकुवत झालंय

Weak heart signs | saam tv
येथे क्लिक करा