Saam Tv
दादर हे स्थानक पश्चिम आणि मध्य रेल्वेला जोडणारे आहे.
९९ टक्के लोकांना माहितच नाही की दादर या शहराला लोक 'खोतवाडी' म्हणून ओळखायचे.
मुंबईचा विकास होण्यापुर्वी ब्रिटीश राजवटीच्या वेळेस दादरमध्ये अनेक खेडी होती. त्यातीलच एक म्हणजे खोतवाडी.
खोत म्हणजे जमीनदार. हे नाव सुद्धा तिथे स्थायिक असणाऱ्या एका कुटुंबावरून पडले.
१९०० च्या दशकात, मुंबईत इंडस्ट्रियलायझेशन व लोकसंख्येची वाढ झाली. त्यावेळेस दादरचे शहरीकरण केले गेले.
या भागात रेल्वे स्टेशन बांधले गेले आणि नाव ठेवण्यात आले 'दादर', जे त्यावेळी असलेल्या गावाचे अधिक प्रचलित नाव होते.
'दादर' या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये "पूल" किंवा "फूटपाथ" असा होतो.
काही इतिहासकारांच्या मते, या परिसरात पूर्वी एक पूल होता किंवा घाटावरून लोक प्रवास करत असत, त्यामुळे हे नाव रूढ झाले असावे.